शबनम न्यूज :पुणे (दि.०४ जानेवारी) :- पुण्यातील सारसबागेसमोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवानराव वैराट यांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करून त्रिवार अभिवादन केले. याप्रसंगी वैराट म्हणाले की,” महाराष्ट्र शासनाने आंध्र राज्याच्या धर्तीवर दिशा कायद्याने महिला आणि मुलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने शक्ती कायद्याची अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे कौतुक करून पुरुषाला एकवीस वर्षा सज्ञानाची व्याख्या आहे. त्याच धर्तीवर स्त्रियांना देखील 21 वर्षे कासयद्याने लागू करून त्यांचा सन्मान करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पदाधिकारी सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, काशिनाथ गायकवाड, संतोष कदम, चंद्रशेखर पिंगळे, दत्ता कांबळे, उज्वला भोसले, वंदना पवार, सुनील भिसे, दत्ता गरड आदिनी अभिवादन केले.