उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नाना काटे विरोधी पक्षनेते असताना पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो नामकरण दिली मंजुरी
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ जानेवारी) :- सोमवारी पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड शहराचे भाग्यविधाते शरद पवार यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावरून सत्ताधारी भाजपच्या राज्यातील नेत्यांसह शहरातील नेत्यांच्या पोटात पोटशूळ उठले. पिंपरी चिंचवड कामगारनगरी ते उद्योगनगरी आणि सामान्य पाच गावांचे मिळून झालेले पिंपरी चिंचवड महापालिका ते बेस्ट सिटी पिंपरी चिंचवड यामध्ये शरद पवारसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे योगदान आहे. कामगारनगरीत राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक कामगारांना रोजगार मिळाला. तो शरद पवारसाहेब यांच्या दूरदृष्टीने…. त्यांनी केवळ पिंपरी-चिंचवड मेट्रोची ट्रायल रन घेतली तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ते महापौर माई ढोरे यांच्या मनात पोटशूळ उठले. त्यांनी थेट पवार साहेब यांच्या वैज्ञानिक पदाचे तपासणी करण्याचे भाष्य केले. खरं तर ज्या पक्षातून मानाची पदे भोगली. त्याच पक्षाच्या अध्यक्षावरती आरोप करण्याची महापौर यांची कुवत आहे का? असा सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे प्रतिनिधी सत्तेत असताना केवळ केबिनमध्ये बसून कामाची पाहणी व उद्घाटन करत होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेहमी उद्घाटने व कामाची पाहणी फिल्डवरती जाऊन करतात. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यात मीपणा कधीच दाखवत नाहीत. जनतेला सर्व माहित असते. कोणतेही विकास काम करताना जनता डोळ्यासमोर ठेवून करायचं असतं. स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा आपण जनतेसाठी काय करतो हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून भाजपच्या नेत्यांनी शिकावं. तसेच चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना पिंपरी-चिंचवड शहरात किती विकास कामांची पाहणी व उद्घाटन केली. चंद्रकांत पाटील यांनी कोणत्या अधिकाराखाली पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांची उद्घाटने केली असा सवालही नाना काटे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.