शबनम न्यूज : पुणे (दि.२० जानेवारी) :- राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या गेल्या आहेत. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील.
परंतु ,पुण्यातील शाळांबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. पालक , डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जाणार आहेत, आठवड्यापासून पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या सगळ्यांचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
शाळा सुरु करण्याचा निर्णय सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतला जाईल ! pic.twitter.com/qodA4BbaPD
Advertisement— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 20, 2022