सुर सम्राज्ञी, भारतरत्न, गानकोकिळा, लता मंगेशकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले, संपूर्ण जगाला आपल्या सुरेल आवाजाने वेड लावणाऱ्या लता मंगेशकर या 93 वर्षांच्या होत्या 28 सप्टेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता मागील काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजून अकरा मिनिटांनी यांचे दुःखद निधन झाले, 2001 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जड अंतकरणाने लतादीदींना श्रद्धांजली दिली त्यांनी आपल्या शब्दात सांगितले की मी माझे दुःख शब्दात सांगू शकत नाही सर्वांना सांभाळणारी दीदी आम्हाला सोडून गेली आहे ही देशाची खूप मोठी न भरून येणारी हानी आहे.
Advertisement
Advertisement