शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ फेब्रुवारी) :- आपल्या भक्ती मार्गातून आईवडीलांची सेवा तसेच स्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे संत रविदास महाराज हे अंधश्रद्धा विरोधात समाज जागृती करणारे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या प्रतिमेस यावेळी महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, माजी नगरसेवक तानाजी खाडे, भिमा बोबडे, गोरोबा गुजर, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे, दत्तात्रय शिंदे, विनायक लोहकरे, सागर भोसले, पांडुरंग कांबळे, संतोष वाघमारे, सुदाम कांबळे, रमेश साळवे आदी उपस्थित होते.