प्रियंका गोपीनाथ मुंडे / तिडके यांच्या सेव्ह अर्थ संस्था वतीने मोहिमेचे उद्घाटन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.०१ मार्च ) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मुंडे घराण्याचे नाव पुन्हा एकदा सामाजिक कार्यात चर्चेत येताना दिसत आहे, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रियंका गोपीनाथ मुंडे / तिडके आणि शितल सुनील सितप यांनी मिळून एक मोहीम सुरू केली आहे सेव्ह अर्थ , प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध एक लढा ही मोहीम प्रभावीपणे राबवित आहेत प्रियंका गोपीनाथ मुंडे / तिडके यांनी या मोहिमेची सुरूवात पिंपरी-चिंचवड शहरातील जाधव वाडी मोशी चिखली या ठिकाणी सुरु केली आहे. या मोहिमेचे उद्घाटन 28 फेब्रुवारी रोजी स्वराज सोसायटी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या मोहिमेची संकल्पना प्रियंका मुंडे , तिडके यांनी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांना सांगितली निखिल बोऱ्हाडे यांना ही संकल्पना प्रभावी वाटली त्यांनी या मोहिमेत आपणही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. त्यानुसार युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी प्लास्टिक विरुद्ध च्या लढा मध्ये आपण मोठा वाटा उचलणार असल्याचे सांगितले त्यानुसार या मोहिमेअंतर्गत स्वराज सोसायटी मधील तसेच क्रिस्टल सिटी पर्ल व सफ्यार या सोसायटी मधील कुटुंबीयांसाठी त्यांनी डस्टबिन चे वाटप केले,जेणेकरून सोसायटी धारकांना प्लास्टिकचा कचरा वेगळा करण्यास मदत होईल व या प्लास्टिकच्या कचऱ्याची वेळोवेळी विल्हेवाट लावता येईल.
तसेच या सोसायटी मधील नागरिकांना प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम काय असतात याचीही माहिती प्रियांका मुंडे /तिडके यांनी दिली या मोहिमेत युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांचा मौल्यवान वाटा असून ही मोहीम आपण संपूर्ण भारतभर राबविणार असून या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी असेही प्रियंका मुंडे / तिडके यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले.
या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, व सोसायटीमधील पदाधिकारी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी हि प्रियांका मुंडे / तिडके यांच्या या कार्याचे कौतुक केले.