वृत्तसंस्था
शबनम न्यूज : ०४ मार्च
रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धात काही दिवसा पूर्वीच एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबारात जखमी झाल्याचं वृत्त आहे. केंद्रीय मंत्री व्ही.के सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
गोळी लागलेल्या जखमी भारतीय तरुणाचा व्हिडिओ , मदतीसाठी सरकारकडे याचना
#WATCH "No support from the Indian embassy yet. I have been trying to get in touch with them, every day they say we will do something but no help yet," says Harjot Singh, an Indian who sustained multiple bullet injuries in war-torn Ukraine, receiving treatment at a Kyiv hospital pic.twitter.com/8oc9urO74s
— ANI (@ANI) March 4, 2022
हजारो विद्यार्थांना मायदेशी परत आणण्यात आलं असून अद्याप हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसह दुसऱ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी सांगितले की, हा विद्यार्थी किव्हमधून भारतात सुरक्षित परतण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला.त्यात तो जखमी झाला आहे. यानंतर त्याला पुन्हा शहरात नेण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती मिळाली.असे मंत्र्यांनी सांगितले.
I received info today that a student coming from Kyiv got shot and was taken back midway. We're trying for maximum evacuation in minimum loss: MoS Civil Aviation Gen (Retd) VK Singh, in Poland#RussiaUkraine pic.twitter.com/cggVEsqfEj
Advertisement— ANI (@ANI) March 4, 2022