शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची मासिक बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीसाठी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष – श्री. संदीप बेलसरे, उपाध्यक्ष – श्री. विनोद नाणेकर, सहसचिव – श्री. प्रविण लोंढे, खजिनदार- श्री. संजय ववले, प्रसिद्धी प्रमुख- श्री. विजय खळदकर, संचालक – श्री. संजय सातव, श्री. नवनाथ वायाळ, श्री. विनोद मित्तल, श्री. हर्षल थोरवे, श्री. प्रमोद राणे, श्री. भारत नरवडे, श्री. सचिन आदक हे उपस्थित होते. सूत्र संचालन श्री.प्रमोद राणे यांनी केले. या बैठकीत प्रत्येक संचालकाने एक या प्रमाणे स्विकृत संचालकाची नेमणूक करण्यात आली. स्विकृत संचालक म्हणून श्री. माणिकराव पडवळ, श्री. प्रसाद कोलते, श्री. प्रमोद दिवटे, श्री. सचिन पाटील, श्री. सचिन रोडे, श्री. रामदास जैद, श्री. रमेश होले, श्री. संजय भोसले, श्री. विकास नाईकरे, श्री. सुनील शिंदे, श्री. अशोक पाटील, श्री. विलास मेमाणे, श्री. किशोर शिनगारे, श्री. श्रीपती खुणे, श्री. कुलदीप भुर्जी यांची नियुक्ती पत्र देऊन नेमणूक कण्यात आली.
तसेच सल्लागार म्हणून संघटनेचे संस्थापक व मा. अध्यक्ष श्री. तात्या सपकाळ, मा. अध्यक्ष श्री. सुरेश तात्या म्हेत्रे, श्री. चांगदेव कोलते, श्री. बशीरभाई तरासगार, श्री. दिनकर साळुंखे, श्री. गौरंग बनकर, श्री. पृथ्वीराज जांगीड, श्री. गणेश खेडकर, श्री. राजू देशपांडे, श्री. सुधीर पाटील, श्री. दशरथ चव्हाण, श्री. अजय लोखंडे, श्री. भालचंद्र गुंठे, श्री. अनिल कांकरिया , श्री. खेताराम विश्नोई, ADV. रिना सिंग यांना नेमणूक पत्र देऊन नेमणूक करण्यात आली.
नवीन स्विकृत संचालक व सल्लागार यांना पदाधिकारी व संचालकांनी संघटनेचे कामकाज कशा प्रकारे चालते, संघटनेचा कोणकोणत्या सरकारी कार्यालयाशी सबंध येतो. एकत्रित आल्यानंतर संघटनेला काय महत्व प्राप्त होते. संघटनेची ताकद कशा प्रकारे वाढते. या आणि अशा अनेक विषयांचे मार्गदर्शन केले .बैठकीच्या शेवटी उपाध्यक्ष श्री. विनोद नाणेकर यांनी बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानून नवीन स्विकृत संचालक व सल्लागार यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.