शबनम न्यूज : पुणे (दि.०६ मार्च) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. उदघाटनानंतर मेट्रो सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी खुली करण्यात आली आहे. मेट्रो प्रवासाचा आनंद घेत असताना या प्रवासाच्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एकूण 13 तास मेट्रो धावणार असून, दर अर्ध्या तासाला मेट्रोची फेरी असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी तीननंतर सर्वसामान्य नागरिकांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. तसेच सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.
हे करा
-
मेट्रोतून प्रवास करताना प्रवाश्यांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायची आहे.
-
प्रवास करताना रांगेत यावे. मेट्रो प्रवासात दृष्टीहीन प्रवाश्यांसाठी बनवण्यात आलेला मार्ग मोकळा ठेवावा, जेणे करून या प्रवाश्यांना प्रवास करणे सोपे जाईल.
-
मेट्रोतून प्रवास करताना प्रवाश्याच्या जवळ 25 किलो इतकेच सामन नेता येईल. सामानाच्या वजनाची मर्यादा घालून दिली आहे. (सामना 25 किलो पेक्षा अधिक वजनाचे नसावे.सामना 60 सेमी लांब45 सेमी रुंद व 25 सेमी उंच असावे.
-
फलाटवर असलेल्या पिवळ्या रेषेच्या पलीकडे उभे राहावे.
-
प्रवास करताना महिला, मुले, दिव्यांग ,जेष्ठ नागरिकांना मार्ग मोकळा करून देऊन सहकार्य करावे.
-
स्थानकावर, फलाटावर गरज लागल्यास तेथील सुरक्षा रक्षक, ग्राहक मदत केंद्राशी संपर्क साधा
हे करू नका
-
मेट्रोतून प्रवास करताना कचरा करु नका.
-
मेट्रो ट्रॅकवर पाऊल टाकू नका.
-
बंदुके, शस्त्र , दारुगोळा बाळगू नका.
-
ट्रेनचे दरवाजे जबरदस्तीने उघण्याचा प्रयत्न करू नका.
-
रेल्वे प्रवासात पाळीव प्राणी बाळगू नका.
-
तिकिटाविना प्रवास करण्याचा प्रयत्न करू नका.
-
मेट्रो स्थानकांचे विद्रुपीकरण करू नका.
-
तुम्ही जरा दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक नसाल तर लिफ्टचा वापर करू नका.
-
मद्यपान व नियम तोडण्यास प्रतिबंध आहे.
-
स्थानक व ट्रेनच्या आता खाद्यपदार्थाचा वापर करू नका.
अश्या सूचना मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
#पुणेमेट्रो ने प्रवास करताना काय करावे, काय करू नये.
Dos and Don'ts while travelling in #PuneMetro.
#AaliApliMetro #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/25msAtlIJuAdvertisement— Pune Metro Rail (@metrorailpune) March 6, 2022