जिल्हा परिषद मधील माहिती तंत्रज्ञान शिक्षकांचा होणार सन्मान
शबनम न्यूज : पुणे ( दि.२२ मार्च ) :- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए .इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या पै आयटी ऑलिंपियाड स्पर्धांचे पारितोषिक वितरण 23 मार्च रोजी आझम कॅम्पस मधील असेंब्ली हॉल मध्ये होणार आहे. याच कार्यक्रमात पै आयटी नॅशनल एज्युकेटर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.संस्थेचे सहसचिव प्रा.इरफान शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या उपक्रमाचे हे तपपूर्ती वर्ष आहे.
डॉ.ऋषि आचार्य आणि अंजुम काजळेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जिल्हा परिषदांमध्ये माहिती तंत्रज्ञान शिकविणाऱ्या उमेश खोसे,मृणाल गंजाळे ,एड.नागनाथ विभुते,प्रकाश चव्हाण,शफी शेख,आनंदा अनेमवाड यांना पै नॅशनल आयटी एज्युकेटर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.एकूण १५ लाखांची पारितोषिके या समारंभात दिली जाणार असून त्यात लॅपटॉप,नोटबुक,आय पॅड,मोबाईल संच,हॅंडीकॅम,टेलिस्कोप,सन्मा नचिन्ह ,प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे.