पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडविणेसाठी महानगरपालिकेमार्फत २४x७ एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ मार्च ) :-
पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत २४x७ एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, गढूळ पाणी, व्हॉल्व लिकेज, पाईपलाईन फुटणे इ. प्रकारच्या तक्रारी विभागास प्राप्त होत आहे. त्यास अनुसरून आगामी काळात पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडविणेसाठी महानगरपालिकेमार्फत २४x७ एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणेत आली आहे. त्यासाठी ७७२२०६०९९९ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे.
पाण्यासंदर्भात आपल्या काही तक्रारी असतील त्या ७७२२०६०९९९ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. सदर तक्रारीचे निरसन करणेस पाणीपुरवठा विभाग कटीबध्द आहे. आपल्या तक्रारीचे वेळेत निरसन होईल, याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील राहील. तसेच शहरातील नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की, उपलब्ध पाणी जपून वापरावे. घरातील, इमारतींमधील, सोसायट्यांच्या आवारातील पाण्याची गळती (Leakages) बंद करावी. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. तसेच रस्त्यावरील दृष्टीक्षेपातील पाणी गळतीबाबत महानगरपालिकेस कळवावे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.