शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, किवळे, विकास नगर भागातील विविध मूलभूत सुविधांबाबत असलेल्या अडीअडचणी व प्रश्नांसंदर्भात आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनसंवाद सभेमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी धारेवर धरले. प्रभागातील अनेक समस्या असताना या समस्यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना नव्हती तसेच विद्यमान नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने प्रभागात केलेल्या विकासकामांचे खापर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरच फोडले जात असल्याने प्रभागातील विविध समस्या व प्रश्नांसंदर्भात या परिसरातील शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र तरस यांनी महानगर पालिकेचे शहर अभियंता यांना निवेदन दिले.
या निवेदनात राजेंद्र तरस यांनी प्रभागातील विविध समस्यांबाबत माहिती दिली. यामध्ये
1. विकास नगर भागात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन खराब असल्याने व त्या जुन्या लाईन छोट्या पडत असल्याने नवीन व जास्त क्षमतेच्या ड्रेनेज लाईन टाकण्यात याव्यात. (काढले चौक, औदुंबर कॉलनी).
2. किवळे, विकास नगर, मामुर्डी भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय विभागात संपर्क साधला असता, परंतु टेंडर नाही असे उत्तर येते आहे तरी आपण लक्ष घालावे.
3. विकास नगर भागातील अनेक नागरिकांनी ऑनलाईन पावती भरून पण ड्रेनेज कचरा उचलणारी गाडी पासिंग ला गेलेले असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. ज्या नागरिकांनी खाजगी गाडी बोलवून स्व खर्चाने ड्रेनेज कचरा उचलला त्या नागरिकांना त्याचा खर्च द्यावा व पालिकेच्या त्या गाड्या उपलब्ध करून द्यावे.
4. किवळे, विकास नगर, साईनगर मामुर्डी भागात ज्या स्ट्रीट लाईट वर झाडांच्या फांद्या येतात त्या तोडण्यात याव्या, या येणाऱ्या फ़ांद्यांमुळे स्ट्रीट लाईट चा प्रकाश मी पडत असल्याने या झाडाच्या फांद्या कट कराव्यात.
5. संपूर्ण प्रभाग क्र. 16 मध्ये ज्या ठिकाणी धार्मिक मंदिरे आहेत त्या ठिकाणी दीपस्तंभ उभा राहावा पालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी असे स्तंभ असावे.
6. प्रभाग क्र. 16 मधील अनेक रस्ते डांबरीकरण जर झाले तर अनेक लोकांचे घरे जुनी असल्याने मागील पावसात त्या नागरिकांचा घरांमध्ये पावसाचे पाणी गेले तरी रस्ते डांबरीकरण करताना योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
7. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभाग क्र. 16 मध्ये मोजक्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. तरी बापदेवनगर, श्रीनगर, दत्तनगर या भागात ही सीसीटीव्ही कॅमेरे
बसविण्यात यावे.
8. न्यू इंद्रप्रभा सोसायटी जवळील बाजूस असलेला डीपी रोड महापालिका विकसित करीत आहेत त्या ठिकाणी अगदी काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. शेजारी के टाऊन नामक बिल्डरची साईट चालू असल्याने त्याने तो रोड खराब केला त्यावर कारवाई करण्यात यावी.
मामुर्डी आदर्श नगर हनुमान कॉलनी त्या ठिकाणी ड्रेनेज ची खूप मोठी अडचण आहे. तरी या सर्व ड्रेनेज च्या समस्या सोडविण्यात याव्या. तसेच या भागात पाणीपुरवठा खूप कमी व कमी दाबाने होत असतो ही अडचण लवकरात लवकर सोडवावी.
10.विकास नगर भागात महापालिकेचे ओ.पी.डी. सेंटर सुरु करावे.
अशा विविध मागण्या राजेंद्र तरस यांनी मनपा ला दिलेल्या निवेदनात केल्या आहे.