शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ एप्रिल) :- नंदकुमार मधुकर वाडेकर पोस्टमन यांचा चिंचवड पूर्व टपाल कार्यालय याठिकाणी 31 मार्च रोजी सेवानिवृत्ती कार्यक्रम पोस्टमास्तर रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.त्यावेळी नॅशनल युनियन चे प्रतिनिधी काळूराम पारखी,देवदास देवकर,भरत बागडे,दीपक गायकवाड,अलिम महालदार,अशोक अवघडे,सुयोग तटकरे,मिलिंद गोरड,अश्विनी मांडवगणे,सुवर्णा मदने, मंदा डोळस सहाय्यक पोस्टमास्तर तसेच पिंपरी चिंचवड मधील बहुसंख्य टपाल कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी त्यांचा नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज पोस्टमन व मल्टी टास्किंग स्टाफ या संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला .वाडेकर हे पिंपरी चिंचवड विभागात वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आऊट सायडर 10 वर्षे नंतर ग्रामीण डाकसेवक म्हणून 7 वर्ष नंतर ग्रुप डी मध्ये20 वर्षे व यामधून परीक्षा देऊन पोस्टमन मध्ये 5 वर्षे अशी एकूण42 वर्षे टपाल खात्यात प्रामाणिक पणे काम करून सेवानिवृत्त झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक सांगडे यांनी केले तर जयदेव थोरात यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.