शबनम न्युज | पुणे
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागांत उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, शाळांच्या वेळेसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
Advertisement