शबनम न्युज | पुणे
नगरसेवक वसंत मोरे शिवसेसाठी योग्य आहे. त्यांनी शिवसेनेत यावे, शिवसैनिक त्यांचे स्वागतच करतील, असे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले. गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिकूल मत व्यक्त केल्यावर ठाकरे यांनी मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढून टाकले.
दरम्यान, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी वसंत मोरे शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागतच आहे. ही कारवाई होण्याच्या आधीच माझी त्यांची भेट झाली होती. राज ठाकरे यांचे एकूण नेतृत्व लक्षात घेतले तर ते तुमच्या वक्तव्यावर काहीतरी ॲक्शन नक्की घेतील, असे मी त्यांना सांगितले होते. त्याचवेळी त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रणही दिले. ते जुने शिवसैनिकच आहेत. त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत आहे. त्यामुळे त्यांची काहीच अडचण होणार नाही, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे संजय मोरे यांनी सांगितले.