शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ एप्रिल ) :- फेसबुकवरून मैत्री झालेल्या मित्रानेच महीलेवर बलात्कार केला आहे तसेच महीलेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ सोशलमिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यत हॉटेल 84 ईस्ट संतनगर मोशी, कायरीड हॉटेल आकुर्डी अशा वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे.
याबाबत पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रम गणपत फडतरे ( वय-34 रा. आर्यन वर्ल्ड हायस्कुल जवळ, भिलारेवस्ती, पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम याने फिर्यादी पिडीत महिलेशी फेसबुकव्दारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन मैत्री वाढवुन त्यांचेशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले तसेच त्यांचे नग्न फोटो व व्हिडीओ काढुन ते सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देवुन फिर्यादी महिलेच्या मनाविरुध्द वांरवार जबरदस्तीने शारीरीक संबंध करत बलात्कार केला. अधिक तपास एमआयडीसी भोसरी करित आहे.