पिंपरी चिंचवड : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे या निमित्ताने विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. या रमजान महिन्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील परिवर्तनवादी युवा संघटना यांच्यावतीने पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टी व मार्गदर्शन शिबिर “दावते एकता युवा मिलाफ” हा कार्यक्रम शनिवार दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी ०३:३० ते सायंकाळी ०७:०० या कालावधीत ऑटो क्लस्टर सभागृह .मोरवाडी चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे .
या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच प्रसिद्ध वकील असीम सरोदे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे प्रमुख वक्ते राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला संबोधन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर तसेच पिंपरी-चिंचवड शहर युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाचे संयोजन, निलेश शिंदे .प्रसन्न डांगे . आयुष निंबाळकर, राहुल पवार , फरहीद सय्यद . प्रमोद ताम्हाणे . शाहरुख शेख .समीर थोपटे .आणि आरिफ काजी . पंकज बगाडे यांनी केली आहे
या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे