पिंपरी चिंचवड ( पुणे )
मातंग एकता अंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी राधिका आडागळे यांची तर उपाध्यक्ष संगीता पवार यांची निवड.. पिंपरी :- मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी दापोडीतील राधिका अडागळे यांची तर काळेवाडीतील संगीता पवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. *यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाशभाऊ बागवे, राज्याचे समन्वयक तथा पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल जी थोरात, पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा ताई खंडागळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दत्तू चव्हाण, युवक आघाडीचे शहराध्यक्ष विशाल कसबे, शहर कार्याध्यक्ष मोहन वाघमारे, उपाध्यक्ष सचिन दुबळे,दिपक लोखंडे, दिलीप आडगळे यासह महिला व युवक बहुसंख्येने उपस्थित होते