- ४ दिवसात घेतला ११५८ नागरिकांनी लाभ ; ६६३ नागरिकांना मोफत चष्मे वाटप
- १२६ नागरिकांचे होणार मोतीबिंदू ऑपरेशन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व एच व्ही देसाई नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन आणि मोफत चष्मे वाटप शिबीराला प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
प्रभागातील दळवीनगर, बिजलीनगर, शिवनगरी, चिंचवडेनगर या भागात नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी सोबतच चष्मे वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर राबविण्यात आले चारही दिवस अत्यंत उस्फुर्त प्रतिसादात नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. पुढील कार्यवाहीसाठी नागरिकांना ऑपरेशनसाठी तारखा दिल्या असून लवकरच या सर्वांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे.या चार दिवसात एकूण ६६३ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले तसेच १२६ नागरिकांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पुढील तपासणीसाठी तारखा देण्यात आल्या आहेत.
यावेळी श्री. शेखर अण्णा चिंचवडे, मा. नगरसेवक नामदेव ढाके, आबा सोनावणे, श्री.अनिल तारू यांच्या हस्ते नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले, शिबिराच्या यशस्वीतेसाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन,प्रसन्न मेडिकल चॅरीटेबल ट्रस्ट चे सहकार्य लाभले. यावेळी राजेंद्र चिंचवडे, दत्ता भगवान चिंचवडे, उत्तम चौरे काका, जयवंत भोसले, नामदेव कुंभार, विशाल गडगुळ, विजय थोरवे, विशाल वाणी, रमेश पिसे, कृष्णा वाघमारे, फणसाळकर, केळकर, हिंदुराव जाधव, सतपाल गोयल, हनुमंत हाके सर, नाना दीवाने यांनी परिश्रम घेतले.