शबनम न्युज | पुणे
पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये १९६१ ते १९७२ या काळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या १९७२ बॅचच्या संघाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी बालक-पालक फाउंडेशनला १९७२च्या बॅचतर्फे तनया-ईशा प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘गाथा शौर्य पदकांची – परमवीर चक्र’ या पुस्तकाच्या १०० प्रती विद्यार्थ्यांना वाचनास देण्यासाठी सुपूर्द करण्यात आल्या. बालक-पालक फाउंडेशनतर्फे अनिकेत जोशी यांनी ही पुस्तके स्वीकारली. १९७२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे या पुस्तकाचा २ लाख रुपय किमतीचा ७५० पुस्तकांचे वाटप विविध विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ७५० पुस्तके विद्यार्थ्यांना देण्याचा संकल्प आम्ही केला असून विद्यार्थ्यांमध्ये सैन्यदला बद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी प्रकाशित ‘गाथा शौर्य पदकांची – परमवीर चक्र’ या पुस्तकाची निवड केल्याचे या उपक्रमाचे समन्वयक शशांक वाघ यांनी सांगितले. अशी पुस्तके संग्रहालयात किंवा वाचनप्रिय विद्यार्थ्यांसाठी हवी असल्यास पुढील दूरध्वनी वर संपर्क साधावा. (शशांक वाघ – ७३५०१११८८८)
गेले वर्षभर कचरा प्रक्रिया प्रकल्पाला २५ खुर्च्या, करोना काळात विश्रामबाग पोलिस ठाण्यास सॅनिटायझर, फ्युमिगेशन व संगणक संच, एड्स बाधित दांपत्यास शिलाई यंत्र व मिक्सर आहेर देणे, होतकरू गायिके स्मार्ट फोन व कराओके संच, मॉडर्न प्राथमिक शाळेतील मधील गरीब विद्यार्थ्यांची थकीत फी भरणे, शालेय साहित्य देणे, ७५० बालक पालकांना सर्कस चा खेळ दाखवणे, गुरुजनांचा सत्कार करणे व त्यांच्या आठवणीं वर पुस्तिका प्रसिद्ध करणे आणि पुस्तक वाटप अशा उपक्रमांमधून मॉडर्न हायस्कूलच्या १९७२च्या बॅचचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले असे शशांक वाघ यांनी सांगितले.