शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
प्रभाग क्रमांक २० रामनगर येथील गेल्या अनेक दिवसांपासून काही ठिकानी अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे. या संदर्भात महानगर पालिका अ प्रभाग पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत विशाल काळभोर (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, पुणे शहर ज़िल्हा प्रभारी) यांनी प्रत्यक्ष भेट घेतली.
विशाल काळभोर म्हणाले कि, तसेच दत्तनगर भगातील पाईप लाइन लिंकेज झाली होती त्या कामाची व नवीन पाईप लाइन कामाची ही पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरीकांनी विशाल काळभोर यांना या भागातील समस्या सांगितल्या. त्याच प्रमाणे नागरीकांना जर नवीन नळ जोड हवा असेल त्यांना २०० ₹ भरून नवीन कनेक्शन घेण्यास सांगीतले व ज्यांचे कनेक्शन लीगल आहे त्या सर्व नागरीकांना लगेच पाईप लाइन जोडून घेण्यास सूचना ही विशाल काळभोर यांनी दिल्या.
यावेळी विशाल काळभोर म्हणाले कि, आंबेडकरनगर येथे देखिल कमी दाबाने पाणी येते अशी तक्रार होती. तेथे देखील जाउन पहाणी केली व लवकरच पाणी प्रश्न सोडवू असे सांगितले.