शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराचे कामगार नेते, महाराष्ट्र कामगार सल्लगार समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघ महाराष्ट्र राज्य इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिसानिमित्त राहुलदादा भोसले युथ फाऊंडेशन यांच्या वतीने आणि देवा ग्रुप व शिवसेना शाखा मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती,ताम्हाणेवस्ती,प्रभाग क्रमांक १३ मधील ज्ञानदा प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यानसाठी शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले .
शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक राहुलदादा सर्जेराव (आबा) भोसले यांनी संयोजनाखली हा कार्यक्रम आयोजित केला यावेळी भोसरी विधानसभा ज्येष्ठ शिवसैनिक मा.समन्वयक भोसरी विधानसभा सर्जेराव नारायण (आबा) भोसले विभाग प्रमुख सतीश डीसले, प्रभाग समन्वयक – सुर्यकांत देशमुख, उपविभागप्रमुख चंद्रकांत जाधव, दादाराव ठाकरे,शाखाप्रमुख आनंद हिंगे, सुखदेव देवकर ,हरिभाऊ लोहकरे, विजय शिवपुजे ,अशोक गायकवाड, अनंत मते, भोसरी विधानसभेचे महिला संघटिका जनाबाई गोरे, चिमा आप्पा फाले,कोंडीबा पोवार,युवा सेनेचे देवा कुलकर्णी,नेताजी गुंड,गणेश गुंड,आनंद कापसे, प्रसाद डांगे,हर्षद शेख,अजय गवळी ,गणेश सरवदे,सागर साबळे, सागर लोखंडे,पवन मस्के,ओम हळनर, ज्ञानेश्वर हेळवें,महेश भांडवलकर,रुपेश मस्के,ऋषी सुर्वे,संकेत सरवदे आदी उपस्थित होते.