शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कष्टकरी कामगार व त्याच्या कुटुंबीयाच्या करिता ” मोफत रुग्णवाहिका सेवा अर्पण ” सोहळा आयोजित करण्यात आला असून, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या योजनेतील नोंदीत बांधकाम कामगार यांच्या लाभार्थी मुलांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्र विक्रेते/ कोविड महामारिमुळे शिक्षणापासून वंचित यांच्या मुलांना शैक्षणिक खर्च प्रधान व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना इरफान सय्यद यांनी सांगितले कि, महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा श्रद्धास्थान ” हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” आणि शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ, नेतृत्व आणि रयतेचे लाडके मुख्यमंत्री ” उद्धवजी ठाकरेसाहेब ” यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा सदैव गुरुस्थानी आहेत. यंदा माझा वाढदिवस कोरोना योद्धे, कष्टकरी, माथाडी, आणि बांधकाम कामगारांना समर्पित करतो.