शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनिटने पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने आरोपीची ओळख सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) देविदास कारंडे (वय, ३०) अशी केली असून तो रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात संलग्न होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, कामगार कंत्राटदार रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करत होता.
एपीआय कारंडे याने लेबर कॉन्ट्रॅक्टरकडे कंपनीकडून थकबाकी वसूल करण्याचे आश्वासन देत दोन लाख रुपयांची लाच मागितली. कंत्राटदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नसून कंपनीसोबतचा करार कायम राहील, असे आश्वासनही कारंडे यांनी दिल्याचा आरोप केला.याप्रकरणी तक्रार आल्यानंतर एसीबीच्या पथकाने ८ जून रोजी त्याची पडताळणी करून कारंडे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला.