शबनम न्युज | मुंबई
विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार होती. यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचं उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं आहे.
यावेळी बोलताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आज महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हे कायदेमंडळ असून वेगवेगळे कायदे करतो. प्रत्येकाचा विचार, आशा, अपेक्षा या सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
योगायोग म्हणजे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असून त्यांचे सासरे निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. जावई आणि सासऱ्याचं एकमत होत नाही असं म्हणतात असं मिश्किलपणे फडणवीस यावेळी म्हणाले.
This government of BJP-Shiv Sena alliance, under the leadership of Eknath Shinde, will try to fulfill all the aspirations of Maharashtra and we hope that you (Speaker) will give a good co-operation for the same: Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis in the State Assembly pic.twitter.com/KHqwXg9kjk
— ANI (@ANI) July 3, 2022
Advertisement