शबनम न्युज | मुंबई
बाळासाहेबांचं वचन कोणी मोडलं हे माहिती आहे. अयोध्येच्या राम मंदिरात आमचं योगदान आहे सांगता आणि जे त्याला काल्पनिक समजता त्यांच्याकडे जाता अशा शब्दात मुनगंटीवार यांनी आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात शिवसेनेवर टीका केली.
पुढे ते म्हणाले, एक दिवस तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही का? फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही आग लावण्याचं काम करत आहात. तुम्हाला भाजपा समजलेलीच नाही. ज्यांना काही समजलेलं नाही त्यांच्या दु:ख भिंती ऐकत होत्या. सगळं आपल्याच कुटुंबात नेत आहेत. असेल हिंमत तर सांगा कुटुंबातील व्यक्तीला नाही देणार. कार्यकर्त्यांनी फक्त झेंडेच मिरवायचे का? अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केला.
अभिनंदन प्रस्तावात दुख आणि सत्ता गेल्याची वेदना दिसत आहेत. अजित पवार यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आहे. जसे तुम्ही २३ नोव्हेंबरला इकडे येऊन उपमुख्यमंत्री झाले तसंच आता झालं. कधीतरी अशी उडी मारावी लागते असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.