पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभागरचनेचा वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
पिंपरी | शबनम न्यूज
नियमाबाह्य आणि चुकीच्या पध्दतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना केल्यामुळे भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यानी या संदर्भात विविध स्तरावर आव्हान दिले. राज्य निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयातील लढाईनंतर आता त्यांनी या प्रकरणी सर्वोच्च यालयाकडे देखील दाद मागितली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी दिनांक १२ जुलै २०२२ रोजी याचिका सुनावणी अनुक्रमांक १५.४ वर होणार आहे. माजी नगरसेवक विलास मडिगेरी हे आज सकाळी च दिल्लीला पोहोचले आहे. महापालिका आयुक्त व प्रशासनाने खूप चुकीच्या पद्धतीने अनागोंदी व मनमानी कारभार प्रचंड गोड घातल्यामुळे राजकीय लोकांच्या दबावाखाली काम केले आहे आमच्या विश्वासाला तळा गेला आहे त्यामुळे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय मध्ये दात मागावी लागली आमचा प्रामाणिक लढ्यात सत्याचाच विजय होईल अशी ही खात्री विलास मडिगेर यांनी व्यक्त केली.