शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
दिवंगत नगरसेवक कै. जावेद शेख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक /अध्यक्ष निखिल दळवी यांनी दिली आहे.
सदर उपक्रमामध्ये भव्य रक्तदान शिबिर (प्रत्येक रक्तदान आकर्षक भेटवस्तू), मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर, मोफत सर्वांसाठी रक्त तपासणी (आवश्यक असणाऱ्या सर्व रक्त चाचणी), महिलांसाठी मोफत थायरॉईड चाचणी, आकुर्डी परिसरात वृक्षारोपण, कार्यक्रम स्थळी वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबिर हे नगरसेवक जावेद शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ विठ्ठलवाडी आकुर्डी पुणे – ३५ येथे ३१ जुलै २०२२ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे.
तसेच सदर उपक्रमाचे जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निखिल दळवी यांनी केले आहे.