शबनम न्यूज | पुणे
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ दिव्य स्वातंत्र्य रवि’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
भारतीय स्वातंत्र्य लढयातील संगीत रंगभूमीच्या योगदानाचे सादरीकरण या विशेष कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. संगीत नाटकातील संवाद, नाटयपदे यांचा समावेश या कार्यक्रमात असणार आहे.संकल्पना, संगीत मार्गदर्शन मधुवंती दांडेकर यांची असून चिन्मय जोगळेकर, पूर्णा दांडेकर, संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, वर्षा जोगळेकर, गंधार दांडेकर आणि मधुवंती दांडेकर सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १३४ वा कार्यक्रम आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करावा, या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मधुवंती दांडेकर यांनी दिली.