शबनम न्युज | पिंपरी
नागपंचमी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला गेला. पिंपरी चिंचवड शहरात नागपंचमी सणानिमित्त माजी नगरसेविका स्विनल म्हेत्रे, व माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे यांच्या वतीने आयोजित नागपंचमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या प्रभागातील महिलांनी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला. नागपंचमी सणानिमित्त मंगळागौरी हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला. या मंगळागौरी कार्यक्रमाला महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच या निमित्ताने विविध खेळ महिलांसाठी आयोजित करण्यात आले. या खेळाचाही आनंद अनेक महिलांनी लुटला.
नागपंचमी सणानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना माजी नगरसेविका स्विनल म्हेत्रे यांनी सांगितले कि, महिलांना अशा विविध संधी दिल्याने त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळत असतो. त्यांनी सर्व महिलांचे यानिमित्ताने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या मान्यवरांचे माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे यांनी स्वागत केले. तसेच आभार व्यक्त केले.