शबनम न्युज | पिंपरी
स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पिंपरी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४:३० वाजता महिलांसाठी फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे चालू मेट्रो ट्रेन मध्ये सुद्धा वॉक असणार आहे, अशी माहिती दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी दिली.
तसेच मंगळागौर या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार उपस्थित राहणार असून यामध्ये तसेच या ठिकाणी मुलींना प्रोत्साहन वातावरण निर्मितीसाठी दुर्गा ब्रिगेडच्या मुली लाठीकाठी आणि मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक केले जाईल, या मध्येसर्व साधारण गृहिणी सुद्धा भाग घेऊ इच्छिता आपली आवडती वेष परिधान करू शकतात, तसेच सामाजिक कार्यामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा ७५ महिलांचा सन्मान सुद्धा करण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांना सन्मानित करण्यात येईल, असे दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले. तसेच ज्या महिला बचत गटांना आणि महिलांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी कृपया दुर्गा ब्रिगेड संघटनेची संपर्क साधावा ७७५८९८८४८ असे आवाहन दुर्गा भोर यांनी केले आहे.