शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
”माझा बाप्पा” संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समिती चित्र शिल्प हस्त कला विधा आयोजित दिनांक ३० आँगस्ट २०२२ रोजी पीएनजी कलादालन चिंचवड येथे प्रदर्शनाचे उदघाटन संस्कार भारतीचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य आणि सुप्रसिद्ध चित्रकार श्री रवीजी देव व लायन इंटरप्रायझेस चे मा. गव्हर्नर आणि सुप्रसिद्ध उद्योजक ओमप्रकाश पेठे यांच्या शुभहस्ते झाले.
व्यासपीठावर अध्यक्ष सचिन काळभोर,पश्चिम प्रांत साहित्य विधा संयोजिका सौ. विशाखा कुलकर्णी, सचिव सौ. लीना आढाव पश्चिम प्रांत प्राचीन कला व ऐतिहासिक वास्तू विधा सह संयोजिका सौ. विनिता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन भाग्येश अवधानी ह्यांनी सांभाळले. या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड विभागातील ४० चित्रकारांनी (वयोगट ११ वर्षे ते ७० वर्षे) बाप्पाची चित्र साकारली आहेत. हे प्रदर्शन ११ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. सचिव लीना आढाव यांनी संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समिती च्या कार्याची माहिती दिली.
अनेक चित्रकारांनी ब्रश खाली ठेवले होते, पण संस्कार भारती च्या कार्यकर्त्यांमुळे त्यांनी पुन्हा चित्रकलेला सुरुवात केली. असे मत सहभागी कलाशिक्षक रमेश खडबडे यांनी सांगितले.
रवी देव यांनी संस्कार भारती कलेच्या माध्यमातून एक सामाजिक संस्कार देत आहे हे नमूद केले. सर्व कलाकारांचे अभिनंदन केले. आपण काढलेली चित्रे आपण आपल्या घरात लावली पाहिजेत असा आग्रह त्यांनी सर्व कलाकारांना केला. आजी बरोबर कीर्तनाला जाताना, रस्त्यावरील कोळसा आणि खडू ह्यांनी काढलेली मोठी चित्रे बघून त्यांच्यावर चित्रकलेचा कळत नकळत संस्कार झाला असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. नुकतेच देहू मंदिरात एक अप्रतिम चित्र भेट दिले, ते चित्र कसे साकारत गेले हे त्यांनी सांगितले. त्यांचेही चित्र प्रदर्शनात विराजमान आहे.
ओमप्रकाश यांनी कलाकारांनी चित्र काढली की वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठीही उपलब्ध केली पाहिजेत आणि लोकांनी ती आवर्जून विकत घेतली पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष श्री. सचिन काळभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास उपसचिव सतिश वर्तक, सायली काणे. प्रियाताई जोग,शिल्पा ताई बिबिकर, रवींद्र जी कुलकर्णी व समितीचे इतर सदस्य व सर्व सहभागी कलाकार उपस्थित होते.