रिपब्लिकन अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने सन्मानित
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) पक्षाचे नेते व अल्पसंख्यांक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस खाजाभाई शेख यांना पक्षाच्या वतीने कर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी समाजकारणातील तसेच राजकारणातील व आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व त्यांच्या मोठ्या योगदानाबद्दल अल्पसंख्यांक आघाडी पिंपरी चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन कर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर खाजाभाई शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि, हा पुरस्कार म्हणजे मला माझ्या प्रामाणिकपणाने केलेल्या कार्याची पावती आहे. तसेच या पुरस्काराने मला भविष्यकाळात सामाजिक कार्यात अत्यंत तीव्रतेने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. यापुढे मी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम अविरतपणे सुरूच ठेवणार आहे. तसेच हा पुरस्कार मला मिळाला, याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करतो.
सदर कार्यक्रमात अल्पसंख्याक आघाडी चे अध्यक्ष मा शादाब पठाण, फय्याजभाई सनदी, शेखलाल नदाफ, आप्पालाल नदाफ , अमजद जमादार, शाकीर तांबोळी, अश्वीनी सहारे, नजीर भाई सय्यद, कमरोद्दीन तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व उपस्थित त्यांनी खाजाभाई शेख यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.