शबनम न्युज | पुणे
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एस ए ई इंडिया)ने आयोजित केलेल्या ‘बाजा एस ए ई इंडिया २०२३’ या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन अभियांत्रिकी वाहन मॉडेल मेकिंग स्पर्धेचे उद्घाटन डॉ.अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठ (लोहगाव,पुणे) येथे शनिवारी झाले .
विद्यापीठाचे कुलगुरू हृदयेश देशपांडे, हिरो मोटो कॉर्प चे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अरुण जावरा यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला.या उपक्रमाचे हे सोळावे वर्ष असून देशभरातून 200 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या टीम सहभागी झाल्या आहेत.सर्व ठिकाणी,सर्व प्रकारच्या परिस्थितीत चालणाऱ्या ‘सिंगल सीटर ऑल टेरेन व्हेईकल‘ वाहनाच्या मॉडेल निर्मितीसाठी देशातील १० हजार अभियांत्रिकी विद्यार्थी सज्ज झाले आहेत !
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ‘बाजा एसएई इंडिया ‘संयोजन समितीचे अध्यक्ष संजय निबंधे,एसएई इंडियाच्या अध्यक्ष रश्मी उर्ध्वरेषे,बाजा एसएई इंडियाचे सल्लागार डॉ.के.सी.व्होरा,डॉ अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या अधिष्ठाता श्वेता शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.
एसएई इंडियाचा हा सर्वात मोठा उपक्रम असणार आहे.तीन टप्प्यात ही मॉडेल मेकिंग स्पर्धा होत आहे.17,18 सप्टेंबर रोजी आरेखन तयार करणे,18 सप्टेंबर रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि डिसेंबर मध्ये पुढील टप्पा आयोजित करण्यात आला आहे.जानेवारीमध्ये स्पर्धेची अंतिम फेरी होईल.
यावेळी बोलताना डॉ.अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू हृदयेश देशपांडे म्हणाले,’वाहनांची ही मॉडेल मेकिंग स्पर्धा तंत्रज्ञान,नव संकल्पना, टीमवर्क यांचा कस लावणारी आहे.आमचे विद्यापीठ या संयोजनात यजमान म्हणून मोठा वाटा उचलत आहे.अभियांत्रिकी विद्यार्थ्यां च्या प्रगतीमध्ये ही स्पर्धा मोठे योगदान देईल.
रश्मी उर्ध्वरेषे म्हणाल्या,’ही स्पर्धा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मानाची स्पर्धा आहे.त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.विद्यार्थी,प्राध्यापक,शैक् षणिक संस्था आणि अभियांत्रिकी उद्योग या सर्व घटकांना ही स्पर्धा शाश्वत उद्दिष्टांसाठी एकत्र आणते.
संजय निबंधे म्हणाले ,’स्वतःच्या हाताने सर्व कठीण परिस्थितीत चालू शकणारे वाहनाचे मॉडेल तयार करणे, हे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आवडणारे आव्हान असून विद्यार्थ्यांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देखील आहे‘.