शबनम न्युज | पुणे
नवी सांगवीतील समतानगर मधील ३६ वर्षीय रोहित भोर या तरुणाचा औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. तो बारा दिवस मृत्यूशी झुंज देत होता, अत्यंत प्रेमळ, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला प्रेमळ रोहित सर्वाच्या मनाला वेदना देऊन गेला, त्याचे वडीलही चिमणराव भोर यांचा ही गेल्या वर्षी कोरानामुळे मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. सध्या कोरोना कमी झाला अन न्युमोनिया आणि डेंगी आजारांने नागरिक दस्तावलेले आहेत.
रोहितचे लहान भाऊ विनीत भोर म्हणाले कि, समता नगर गल्ली नंबर दोनच्या पाठीमागे ढोरे फार्म हाऊसच्या जवळच एका खाजगी बांधकाम व्यवसायिकाने बांधकाम चालू केले आहे, त्या खाजगी जागेत पाण्याची फार मोठी ढबके तयार झाले आहेत, त्यामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशा साठलेल्या पाण्यातच डासाची उत्पत्ती होत आहे, याचा त्रास सी.एम.ई. कॉलनीतील व समतानगर मध्यील नागरिकांना होत आहे, याचा पालिकेने गांभीर्याने विचार करावा आणि अजून कोणालाही त्रास होणार नाही व मृत्यू ला सामोरे जाऊ लागू नये याची मनपाने दक्षता घ्यावी, असे विनीत भोर यांनी यावेळी सांगितले.
तसेच यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले कि, पालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात फवारणी करून साठलेल्या डब्यातील पाणी काढण्यासाठी खाजगी व्यवसायिकाला नोटीस पाठवून परिसर स्वच्छ ठेवण्याची ताकीद द्यावी, डेंगी आजाराची जनजागृती आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन, व गर्दीच्या ठिकाणी पालिकेने करावी, असे अण्णा जोगदंड यांनी म्हटले आहे.