शबनम न्युज | भोसरी
माहेर वरून पैसे आणण्यासाठी महिलेचा मानसिक व शारीरिक तसेच आर्थिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ एप्रिल २०१८ पासून ते ९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान म्हापसा गोवा येथे घडली.
या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून, सासरच्या लोकांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर शरद शेटगावकर पती (वय, ३४) शरद सरदु शेटगावकर (वय, ७६) व दोन महिला आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना घरगुती कारणावरून वेळोवेळी माहेरवरून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करून हाताने मारहाण करून तसेच फिर्यादी यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून टाकू अशी धमकी देत फिर्यादी यांचा मानसिक व शारीरिक तसेच आर्थिक छळ केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.