शबनम न्युज | चाकण
दोन अनोळखी इसमांनी दोन तोळ्याचे ८० हजार रु. किमतीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र शंतनू हॉटेल, समोर चाकण, शिक्रापूर रोड, चाकण ता. खेड, जि. पुणे येथे ९ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली.
याप्रकरणी महिलांनी फिर्याद दिली असून, दोन अनोळखी इसमांवर चाकण पोलीस ठाण्यात भा. द.वि. कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मुलगी चाकण शिक्रापूर रस्त्याने पायी चालत जात असताना, शंतनू हॉटेल समोर एक अज्ञात मोटरसायकल वरून दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळ्याचे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व तळेगाव चौक चाकणच्या दिशेने मोटरसायकल सह निघून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.