कर्मचाऱ्यांचे पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर जोरदार आंदोलन
शबनम न्युज | पिंपरी
दि सेवा विकास को – ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना रद्द केल्याने बँकेचे कामकाज कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे.यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी (बुधवारी ) बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर जोरदार आंदोलन केले .
वाचवा रे वाचवा बँक वाचवा , कामगारांनी कोणाकडे जायचे , बँकेचे नुकसान करणाऱ्यांचा धिक्कार असो, बँकेचे वाटोळे करणाऱ्यांचा धिक्कार असो ” अशा जोरदार घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या. पिंपरी बाजारपेठेचे अर्थकारण अवलंबून असणा – या सेवा विकास सहकारी बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी परवाना रद्द केला . त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात गेले . खातेदारांचीही चिंता वाढली. सिंधी समाजातील लोकांनी एकत्र येवून १९७१ च्या सुमारास सेवा विकास बँकेची स्थापना केली होते. व्यापार सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्ज दिले जात होते.बँकेची व्याप्ती वाढली . 25 शाखा सुरु झाल्या.नियमांना तिलांजली देवून निर्णय होवू लागले.
कागदपत्रांची पूर्तता होत नसतानाही कोट्यवधींची कर्जे मंजूर करण्यात आली.या गैरकारभाची तक्रार करण्यात आली चौकशीत विविध १२४ प्रकरणात ४०० कोटीहून अधिक रुपयांचे कर्जवाटप नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे निष्प्न झाले.याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता.बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाहीत. त्यामुळे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या विविध तरतुदींचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला.त्यामुळे बँकेतील सुमारे ३०० कर्मचा – यांचे भवितव्य अंधारात आले असून कर्मचा – यांनी बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले.