पिंपरी चिंचवड | शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्थापना दिन 11 ऑक्टोबर 1982 आहे. आज 11 ऑक्टोबर हा महापालिकेचा 40 वा वर्धापन दिन आहे. या चाळीस वर्षांमध्ये महापालिकेने अनेक क्षेत्रांमध्ये गगन भरारी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेत आठ हजार नियमित कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याच्या प्रगतीमध्ये महापालिकेचा मुलाचा वाटा आहे.
याचे एक ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक म्हणून काम करणारे श्री पवार रामेश्वर सोपान ( सहाय्यक शिक्षक /माध्यमिक शिक्षक संघ -) यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या सेवेमध्ये महापालिकेकडून मिळालेल्या वैभवाचे एक ऋण फेडण्याचे म्हणून त्यांनी 40 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करून पालिकेचे ऋण फेडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे.
त्याचबरोबर शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांचे अतोनात प्रयत्न अनेक विद्यार्थी व पालकांना ही मदत करत असतात. विविध उपक्रमाद्वारे महापालिकेचे ऋण फेडण्याचे त्यांनी आजच्या दिनी ठरवलेले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व अधिकारी ,कर्मचारी व पिंपरी चिंचवड वाशी यांना आजच्या दिनी त्यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.