शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
“पुणे महापालिकेतील महिला पदाधिकाऱ्यासोबत जी भाषा भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी वापरली आहे.त्या विधानांचा आम्ही निषेध व्यक्त करतो, आम्ही सर्व संबधीत महिलेच्या पाठीशी आहोत. तसेच भाजपा आमदार सुनील कांबळे, आपण महापालिकेत सत्तेत असून आमदार आहात, त्यामुळे याचा माज घरी दाखवावा, पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांवर नाही,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.
Advertisement
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याप्रकरणी यांची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आमदार सुनील कांबळे यांच्यावर टीका करत आपल्या आमदारकीचा माज घरी ठेवावा असे म्हटले आहे.
Advertisement