शबनम न्युज | पुणे
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी)च्या वतीने ‘हाय परफॉर्मिंग वर्क टीम्स‘ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.शुक्रवार,दि.१४ ऑक्टोबर रोजी हे चर्चासत्र भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता शैक्षणिक संकुलातील आयएमइडी सेमिनार हॉल येथे झाले.अमित चिल्का,मेघा रावळ–माहेश्वरी या तज्ञांनी मार्गदर्शन केले.भारतीय विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ.सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते.एमबीए आणि बीबीएचे विद्यार्थी आणि प्राध्यापक या चर्चासत्रात सहभागी झाले.
Advertisement