भरपावसात नागरिकांना पाहावी लागते बसची वाट
प्रतिनिधी | रोहित सावते
शबनम न्युज | पुणे
पुण्यातील पी.एम.पी.एल. च्या प्रवाशांना भरपावसात देखील बसची वाट पाहावी लागत आहे. प्रवाशांना दररोजच हा त्रास सहन करावा लागत आहे. आज देखील तळेगाव ढमनेर, वाघोली, केशनंद फाटा, या बस स्टॉप वर भरपावसात नागरिक हे मोठया रांगेत उभे राहून बसची वाट पाहत असताना दिसून आले. दिवसभर नागरिक काम करून दमून आपल्या घरी जात असताना, त्यांना पी.एम.पी.एल. चा एवढा त्रास होतोय, यावरूनच पी.म.पी.एल बस नागरिकांसाठी व्यवस्था कि समस्या? हा प्रश्न निर्माण होत आहे.
ही समस्या पुणे म.न.पा च्या पी.एम.पी.एल. बस स्थानकाची आहे. त्यांनी लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करावे, तसेच प्रवाशांसाठी बसेस वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशी करत आहे. तसेच बस ही उशिराने येते आणि विशेष म्हणजे प्रवाशांसाठी बस स्टॉप वर बसण्याची ही व्यवस्था नाही. म्हणून बस स्टॉपवर बी.आर.टी. ची व्यवस्था करावी, अशी मागणी देखील प्रवाशांकडून होत आहे. पुणे म.न.पा च्या पी.एम.पी.एल. बस स्थानकाने या समस्यांकडे लक्ष घालावे, तसेच मनपाने शहरातील बसेस च्या संदर्भात असणाऱ्या अशा समस्यांची उपाययोजना करायला हवी, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.