शबनम न्यूज | पुणे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी येथील वरिष्ठ महाविद्यालयातील अध्यापन करणाऱ्या व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या वतीने अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य सातत्याने सुरू ठेवावे या उद्देशाने पणत्या पण त्या देऊन दिवाळीनिमित्त गुरुजनवर्गांचा सत्कार करण्यात आला.
Advertisement
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी एका विद्यार्थ्याने अशाप्रकारे आमचा सन्मान करणे हे अत्यंत स्तुत्य व अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यावेळेस महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी यावेळेस प्रशांत सपकाळ यांचे आभार मानले.