शबनम न्यूज | पिंपरी
आज दि. 28/10/2022 शुक्रवार रोजी नेहरूनगर दवाखाना आयोजित “सर्व रोग निदान” शिबीर माजी महापौर हनुमंतराव भोसले ज्युनियर कॉलेज, नेहरूनगर येथे पार पडला. सदर शिबीर मा. नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या सहकार्याने पार पडले. सदर शिबीरात 325 जणांनी लाभ घेतला. सदर शिबीरात वजन, उंची BMI, HB %, BSL (मधुमेह), रक्तदाब तपासणी, नेञ तपासणी, स्ञी रोग-तपासणी, व इतर सेवा देण्यात आल्या.
सदर शिबीराचे उदघाटन माजी महापौर हनुमंतराव भोसले, मा. नगरसेवक राहुलभाऊ भोसले, मा. महापौर वैशालीताई घोडेकर यांनी केले. सदर शिबीराचे आयोजन डॉ. छायाताई शिंदे (वैद्यकीय अधिकारी नेहरूनगर दवाखाना PCMC) यांनी केले.
सदर शिबीरासाठी डॉ. साळवे सर (अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी), डॉ. वर्षा डांगे (महिला वैद्यकीय अधिकारी), डॉ. शैलेजा भावसार (जेष्ठ वैद्यकीय अधिकारी), डॉ. कल्पना गडलिगेकर व सर्व नेहरूनगर दवाखाना स्टाफ, या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य केले.