शबनम न्युज | मुंबई
तो व्हिडीओ पाहा, राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करायला हवं. तसेच, अशा घटना होत राहतात अस बोलणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना केली आहे. यासोबतच आमदार राजीनामा द्यायचा असेल तर द्या, अजित पवार, शरद पवार राजीनामा घेणार का? असा सवाल उपस्थित करत आव्हाड याचं निलंबित करा, अशी विनंती केली आहे.
ठाणे आणि कळवा या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून पुढे सरकत होते. त्यावेळी भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद या त्यांच्या वाटेत आल्या. तेव्हा आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप रिदा रशीद यांनी केला आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
NCP के विधायक जितेंद्र आव्हाड ने मुझे सरेआम बेइज्जत किया,मुझे हाथ से पकड़ कर धक्का दिया कहा तू यहां क्या कर रही है,मैं एक महिला हु इस तरह महिला का अपमान सरेआम किया जा रहा है,पुलिस प्रशासन इस पर कार्यवाई करे @PMOIndia @CMOMaharashtra @DevendraForCM @ChitraKWagh @BJPMM4Maha pic.twitter.com/7vVGBlHUIH
— Rida Rashid (@bjpridarashid) November 14, 2022