शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आज दिनांक 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून अखिल भारतामध्ये साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. तसेच संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला ?कोणी कोणी मदत केली ?त्याचप्रमाणे आपण हे संविधान कधी स्वीकारले? याबाबतची सविस्तर माहिती शालेय विद्यार्थ्यांनी सांगून संविधान दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नववीची कुमारी साक्षी गायकवाड ही होती. या विद्यार्थिनी संविधानाने सर्व भारतीयवाशी यांना दिलेल्या हक्काचे आणि कर्तव्याचे माहिती दिली. इथून पुढे हक्काबरोबर कर्तव्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे असेही सर्व विद्यार्थ्यांना सुचविले. त्याचबरोबर समीक्षा घोडके हिने संविधान गीताचे गायन केले. पवार रामेश्वर यांनी संविधान किती महत्वाचे आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही देश आहे. भारत मातेला एकसंध ठेवण्याचे काम सर्वधर्मसमभाव ,एकात्मता ,राष्ट्रीयता अशा विविध पैलू मध्ये बांधून ठेवण्याचे काम या संविधानानेच केलेला आहे ,असे संबोधित केले.तर साठे सर यांनी संविधान उद्देशिकेचा अर्थ स्पष्ट करून सांगितला.
रावेत शाळेतील सहावी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव सुपे सर, माध्यमिकचे पवार रामेश्वर सर, साठे सर ,पांडुरंग घुगे सर, श्रीमती चारुशीला जाधव , तानाजी शिंदे सर, वीर सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रेश्मा चव्हाण हिने केले. तर आभार कुमारी खडके राशदबी हिने मानले.