शबनम न्युज | मुंबई
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर ठाणे येथे काल रामदेव बाबा यांनी महिलांबाबत अपमानस्पद वक्तव्य केले यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
समस्त महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या रामदेव बाबांचा जाहीर निषेध असो, मुखी राम राम बोला.. आणि ह्याला जोड्याने हाणा.. अशा जोरदार घोषणा यावेळी करण्यात आल्या. रामदेव बाबा यांनी समस्त महिलांची जाहीर माफी मागावी व त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश संघटन सचिव भालचंद्र शिरोळे, महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, युवती अध्यक्ष अदिती नलावडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.