भक्ती कैलास दहिफळे ने विविध क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, रौप्य पदक,कांस्य पदक पटकावून उंचावले स्कूल चे नाव राज्यस्तरावर
पिंपरी चिंचवड : शबनम न्यूज ( प्रतिनिधी )
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र भोसरी येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये भक्ती कैलास दहिफळे हिने पहिला क्रमांक सुवर्णपदक पटकावले आहे.
तसेच भक्ती कैलास दहिफळे हिने संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे इंद्रायणी नगर भोसरी तेथे किक बॉक्सिंग मध्ये दुसरा क्रमांक रौप्य पदक पटकाविला तर कावेरी नगर क्रीडा संकुल वाकड येथे जुडो स्पर्धेत तिसरा क्रमांक कांस्य पदक पटकाविला.
भक्ती कैलास दहिफळे हि बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थीनी आहे.तिच्या या यशा मुळे
भक्ती कैलास दहिफळे हिने बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल चे नाव राज्यस्तरावर उंचावले आहे. तसेच या विद्यार्थीनीची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. या बद्दल शाळेच्या मुल्ह्याध्यपिका जोशना फाळके व ,क्रिडा शिक्षक अक्षय राणे यांच्या सह सर्व शिक्षक वर्ग पालक सामाजिक स्तरातून भक्ती चे अभिनंदन केले जात आहे.