पिंपरी चिंचवड : शबनम न्यूज ( प्रतिनिधी )
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र भोसरी येथे आयोजित करण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेत मध्ये अस्मिता खाडे हिने पहिला क्रमांक सुवर्णपदक पटकावले तसेच मीनाताई ठाकरे स्केटिंग मैदान येथे झालेल्या कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक सुवर्ण पदक पटकावले. व जिल्हास्तरीय झालेल्या सेपक-टकरा चा संघ या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुवर्ण पदक पटकावले.
या संघातील विद्यार्थीनीची नावे :-१. प्रणवी कुमार २. ईशा रोहोकले ३. अस्मिता खाडे
अस्मिता खाडे हि विद्यार्थीनी सेंट उर्सुला स्कूल ची विद्यार्थीनी आहे.तिच्या कामगिरी मुळे सेंट उर्सुला स्कूल चे नाव राज्यस्तरावर उंचावले तसेच या विद्यार्थीनीची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तिच्या या कामगिरी बद्दल क्रिडा शिक्षक सचिनकुमार ववले ,रोहीणी कदम, जॉवेद तुस्कानो, प्रशिक्षक आरती मल्ला यांनी सर्व शालेय शिक्षक पालक वर्गा कडून अस्मिता चे अभिनंदन केले जात आहे.