शबनम न्युज | नागपूर
रिया चक्रवर्तीच्या स्पष्टीकरणानुसार AU म्हणजे अनन्या उदास… असा त्याचा अर्थ आहे. विनाकारण कुणालाही बदनाम करू नये, असे विरोधी पक्षनेते अजित पवार स्पष्ट केले. AU या शब्दाचा अर्थ काय? असे म्हणत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ठाकरे कुटुंबीयांकडे बोट दाखवले होते. मात्र, अजित पवार यांनी विधानसभा सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना AU चा अर्थ स्पष्ट केला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या आठवड्याभरात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान राहुल शेवाळेंनी रिया चक्रवर्तीला AU या नावाने ४४ फोनकॉल्स आल्याचा आरोप केले. तसेच आमदार नितेश राणेंनी AU वरुन ठाकरे कुटुंबीयांकडे बोट दाखवलं. याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला.
दरम्यान, बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही सरकार हे आदित्य ठाकरेंना घाबरत असल्याचा टोला लगावला आहे. आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना या ३२ वर्षाच्या तरुणाला हे सरकार घाबरलंय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “आदित्य ठाकरे यांच्यावर एसआयटी बसवायची. दर आठ दिवसांनी त्यांना बोलवायचं. मग तुम्ही जाणार, टीव्हीवर दिसणार. या ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.